
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
ढोकी/टाकळी ढोकेश्वर :- जिल्हा परिषद सेस अंतर्गत ढोकी तालुका पारनेर येथील पोकळे वस्ती रस्ता सुधारणा करणे कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले येथील पोकळे वस्ती रस्ता सुधारणा करण्याची मागणी माजी सरपंच बाबासाहेब न-हे, गावातील ग्रामस्थ तसेच पोकळे वस्तीवरील ग्रामस्थांची बर्याच दिवसांची होती.आज त्यांची मागणी मार्गी लागली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या वस्तीवर सतुशा बिरोबा मंदिर आहे. या देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त गावातून तसेच शेजारील पठाणवस्ती, भुसारी वस्ती येथील लोक दर्शनासाठी येतात.त्यांना जाण्यासाठी या रस्त्याने मोटार सायकल सुद्धा जाणे कठीण झाले होते परंतु हे काम सुरू झाल्याने आता हा रस्ता चांगला होणार असून दळणवळणला सोयीस्कर होणार आहे.गावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर ही वस्तीअसून साधारण दीडशे लोकसंख्या असलेली ही वस्ती आहे.या वस्तीवरील लहान मुलांना शाळेत येण्यासाठी हा रस्ता अतिशय खराब व दयनीय अवस्थेत झालेला होता.
आता तो चांगला होणार असून मुलांना, महिलांना जाणे-येणे साठी याचा उपयोग होणार आहे.यापूर्वी माजी आमदार विजय औटी यांच्या माध्यमातून ढोकी गावच्या भावनेशी निगडीत असलेला ३ कोटी ७५ लक्ष निधी असलेला पुल, ६१ लाख रुपयांचे तीन बंधारे काम झालेले आहे.माझ्या माध्यमातून समाज मंदिर, गावांतर्गत काँक्रेट करणे, ढोकी फाटा ते ढोकी रस्ता सुधारणा करणे असे कोट्यावधींची काम शिवसेनेचे माध्यमातून झालेचे सभापती दाते यांनी सांगितले
[ सरांनी टाकळीढोकेश्वर गटाबरोबरच तालुक्यांमध्येही मोठी विकास कामे केलेली असून माझ्या गावात वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत शिकणार्या १५ मुला-मुलींना सायकल उपलब्ध करून दिलेले आहे. संवेदनशील नेतृत्व आम्हाला त्यांच्या रूपात लाभले आहे .माजी सरपंच बाबा न-हे]
यावेळी माजी सरपंच बाबा न-हे, जबाजी न-हे, बिरा पोकळे, दादाभाऊ गायकवाड, मेहबूब पठाण, पोपट वाकचौरे, पांडुरंग न-हे, भाऊसाहेब भुसारी, अब्दुल पठाण, नारायण धरम, कोंडीभाऊ धरम, दिनकर न-हे, भाऊसाहेब बरकडे, लहानु बरकडे, रवींद्र बरकडे, छबुलाल पठाण, निवृत्ती भुसारी, शंकर धरम, भूषण पठाण, शेखलाल शेख, छबुलाल शेख, युनूस पठाण कामाचे ठेकेदार बबन वाळुंज, जयवंत वाळुंज इत्यादी मान्यवर उपस्थित होते.