
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- मा.आयुक्त आरोग्य सेवा व संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या आदेशानुसार आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना द्वारे ग्रामीण रुग्णालय कंधार येथे आरोग्य मेळावा दि.18/04/22 रोजी 9 ते दुपारी 4 वा संपन्न झाला. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.आ. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य मेळावा व रोग निदान शिबिरासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा. प्रतापरावजी पाटील चिखलीकर ( खासदार नांदेड ) व प्रमुख पाहुणे म्हणून मा. खा. सुधाकर शृंगारे साहेब (खासदार लातूर )तसेच मा.आ.श्यामसुंदरजी शिंदे साहेब (आमदार कंधार/ लोहा) यांच्या शुभ हस्ते मेळाव्याचे शानदार उदघाटन झाले व विशेष अतिथी मा.आ. तुषार राठोड साहेब (आमदार मुखेड) व सौ. आशाताई श्यामसुंदरजी शिंदे मॅडम महिला प्रदेश अध्यक्ष शेकाप यांची उपस्थिती आयोजित होती .अध्यक्ष व प्रमुख पाहुणे विशेष कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही.
डॉ.नीळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय नांदेड ,डॉ हणुमंत पाटील (आर,एम, ओ. सामान्य रुग्णालय नांदेड), डॉ.सूर्यकांत लोणीकर ( वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कंधार) यांनी प्रास्ताविक करून महाआरोग्य मेळावा विषयी माहिती सांगितली. तसेच इतर कार्यक्रमाची माहिती व प्रस्ताविक उपस्थित डॉ.डी.एल. गुडमेवार यांनी केली. यावेळी कार्यक्रमात बोलताना मा.ना. श्यामसुंदरजी शिंदे साहेब (आमदार लोहा कंधार) यांनी ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामा बाबत केलेले नियोजन यासाठीचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
आरोग्य मेळाव्याचे वैशिष्ट्य :-
सौ. आशाताई शिंदे यांनी स्टॉल ला भेट देऊन समाधान व्यक्त केले. आरोग्य मेळाव्यामध्ये बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ ,कान-नाक-घसा तज्ञ ,नेत्ररोग तज्ञ ,दंत शल्यचिकित्सक तज्ञ,भूल तज्ञ या सर्व तज्ञांच्या उपस्थिती होती. या आरोग्य मेळाव्यामध्ये आयुर्वेद युनानी होमिओपॅथी तज्ञाची उपस्थिती होती.
– वेलनेस ऍक्टिव्हिटी योगा मेडिटेशन ध्यान याबद्दल समुपदेशन करण्यात आले.
– डिजिटल आरोग्य आयडी तयार करण्यात आले.
– एन .सी. डी . स्कॅनिंग मध्ये मधुमेह उच्च रक्तदाब मौखिक कर्करोगाचे निदान व ईसीजी इत्यादी तपासले.
– आयुष्मान भारत कार्ड तयार करून दिले.
– मोफत औषध उपचार व निदान करण्यात आले.
या मेळाव्यात आलेले वेगवेगळ्या विभागाचे सात स्टॉल होते .
– एकूण रुग्णांची नोंद जनरल 806
– डिजिटल हेल्थ आयडी:-108
– आयुष्मान भारत कार्ड -12
– मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे-53 रुग्ण आढळून आले त्यांना जी एम सी नांदेड येथे संदर्भित करण्यात आले.
– या शिबिरामध्ये रक्तदान शिबिर केलेले लाभार्थी-25 एवढे झाले.
– हायड्रोसिल हर्नियाचे 10 रुग्ण आढळून आले.
– सर्व विभागाचे एकूण-2257 लाभ घेतल्याची रुग्णांची नोंद झाली.
– सर्व विभागाचे तज्ञ डॉक्टर:-
डॉ.राजेश टोपे (स्त्री रोग तज्ञ ),डॉ.तजमुल पटेल (हृदय रोग तज्ञ) ,डॉ.संजय पोहरे (कान-नाक-घसा तज्ञ), डॉ.गजानन देशमुख ( बाल रोग तज्ञ) डॉ. महेश पोकले (दंत शल्यचिकित्सक )डॉ. लक्ष्मीनारायण पवार (रक्तदाब आणि मधुमेह), डॉ.संतोष अंगरवार (सर्जन), डॉ. संतोष करपे साहेब (नेत्र विभाग)व तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत मोरे ,डॉ.शाहीन बेगम ,डॉ. गजानन पवार, डॉ. अरुणकुमार राठोड ,डॉ. नम्रता ढोणे व कर्मचारी दिलीप कांबळे, शंकर चिवडे ,लक्ष्मण घोरपडे ,प्रियंका गलांडे ,सुनिता वाघमारे, सुरेखा मैलारे, व ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिका पार्वती वाघमारे ,शितल कदम योगेश्री बीर , राजश्री इनामदार, आयुष्य वैद्यकीय अधिकारी प्रज्वाला बंडेवार निकहत फातेमा डॉ. डी एल गुडेवार व या महा आरोग्य मेळाव्यास सर्व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी विशेषता डॉ महेश पोकळे व डॉक्टर संतोष पदमवार यांनी अथक परिश्रम घेऊन खरे शिलेदार ठरले .इतर कर्मचारी ही उपस्थित होते.या मेळाव्यात येणार्या रुग्णांसाठी अल्पोपाहार चि व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी याचा लाभ घेतला.कंधार वासि यांनी समाधान व्यक्त केले.