
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- येथील प्रसिद्ध साधू महाराज खंदारकर यांच्या तर्फे तीन दिवसीय कीर्तनमाला आयोजित करण्यात आली असून. ह्या दरम्यान दवबिंदू ह्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. भाविकांनी ह्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत साधु महाराज सेवा समिती व वै. शंकर महाराज खंदारकर विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकाव्दारे केले आहे. २१ एप्रिल चैत्र कृ. ५ गुरूवार रोजी सुप्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. लक्ष्मीकांत महाराज पटवारी माजलगावकर यांचे रात्री ८ ते १० दरम्यान हरिकिर्तन होणार आहे.
तर २२ एप्रिल रोजी श्रीसंत साधु महाराज संस्थानचे आठवे वंशज व संत साहित्याचे चिकित्सक व गाढे अभ्यासक ह. भ. प. यशवंत महाराज साधु लिखीत ” दवबिंदू ” चे प्रकाशन दुपारी ३:३० वाजता ह. भ. प. शरद महाराज देगलूरकर (वंशज श्रीसंत गुंडा महाराज संस्थान देगलूर) यांच्या शुभहस्ते तर संस्थानधिपती ह. भ. प. एकनाथ महाराज कंधारकर (साधु महाराज संस्थान कंधार, उमरखेड व पंढरपूर) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवटचे मराठी विभागप्रमुख डॉ. मार्तंड दि. कुलकर्णी, ह. भ. प.ज्ञानेश्वर महाराज कंधारकर,नानासाहेब देशमुख रांजणीकर (जालना ), नंदकुमार दत्तात्रय गादेकर (पुणे), ह. भ. प. बापुराव महाराज मोरे सोनखेडकर (नांदेड) हे राहणार आहेत.रात्री ८ ते १० दरम्यान ह. भ. प. डॉ. शरद एकनाथ महाराज देगलूरकर यांचे हरिकिर्तन सोहळा रंगणार आहे.
२३ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते बारा दरम्यान काल्याचे कीर्तन.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कंधारकर यांच्या गोडवाणीतुन होणार असुन तद्नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर सर्व धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सौ.शैलजा शेखर वाळकीकर-साधु,गोविंद दासराव साधु, दत्तात्रय भाऊसाहेब माने,श्रीराम नरसिंग करेवाड,गौतम किशनराव देशमुख रांजणीकर,आदित्य गोविंद साधु व भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.