
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा :- मोखाडा तालुक्यातील आदिवासी भागातील असलेल्या पंचायत समिती कार्यालयातील सौचालयास अचानक कुलुप बसवून बंद का? पंचायत समितीत येणाऱ्या लोकांना पडलेला प्रश्न ? मोखाडा तालुक्यातील कान्हा कोपऱ्यातुन कागदपत्र व शासकीय योजनांसाठी येणारे लोक हे बहुसंख्येने येणारे लोक असतात कागदिपत्रासाठी किव्हा काही शासकीय योजनांन साठी हे लोक येत असतात.
परंतु या ठिकाणी बाथरूम ची सोय कुठलीही नसून लोकान माध्ये नाराजगी दिसून येत आहे. तसेच या कार्यायलायत रुजू असणाऱ्या कर्मचारी वर्गालाही बाथरूम साठी बाहेर जाव लागत बहुतांश लोकांचं व कर्मचारी वर्गाच म्हणणं आहे की पिण्याच्या पाण्याची व बाथरूम ची सोय लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. या बाबतीत पंचायत समिती सभापती व बीडीओ यांच्याशी सम्पर्क केला असता होऊ शकला नाही.