
दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी
प्रा अंगद कांबळे
म्हसळा :- १६ एप्रिल २०२२ दुपारी ३ वाजता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे कृषी संवर्धन सभापती बबन मनवे, उपसभापती संदिप चाचले, तालुका समन्वय समिती अध्यक्ष नाझीम हसवारे, पंचायत समिती सदस्य मधुकर गायकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समिर बनकर, मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष महेश शिर्के, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, म्हसळा पोलिस तालुका निरीक्षक, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, वरवटणे अध्यक्ष सतिश शिगवण, युवक अध्यक्ष किरण पालांडे, सरपंच स्नेहा सोलकर, उपसरपंच संतोष घडशी, म्हसळा टाईम्स संपादक रमेश पोटले, पत्रकार श्रीकांत बिरवाडकर, न्यू अनंत वाडी ठाकरोळी मुंबई अध्यक्ष राजू जाधव, कार्याध्यक्ष लक्ष्मण खेरटकर , रामचंद्र शिगवण, सचिव किशोर जाधव,ग्रामिण अध्यक्ष भिवा खोपरे, उपाध्यक्ष परशूराम डांगे, सचिव वसंत डांगे महिला अध्यक्षा सरस्वती कापडी, उपाध्यक्ष अल्पा डांगे, सचिव अलका खोपरे आदी ग्रामस्थ व महिला मंडळ आवर्जून उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री मंत्री अदिती ताई तटकरे यांनी सांगितले की, विकासकांमासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, पंचक्रोशीतील मंजूर कामांची पालकमंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली. न्यू अनंत वाडी ठाकरोळी ग्रामस्थांच्या मागणीनुसार महिला कार्यशाळा ७ लक्ष ची मंजुरी देणार असे कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवर यांचे शाळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्री हनुमान जयंती उत्सव सोहळा असल्यांने सत्यनारायणाची महापूजा चे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध कला गुणदर्शणांचा सांस्कृतिक कार्यक्रम रा जि प शाळा ठाकरोळी मार्फत आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमेश खेरटकर यांनी केले, प्रास्ताविक मुंबई मंडळ अध्यक्ष श्री राजु जाधव यांनी केले आभार राहुल जाधव यांनी केले.