
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- जव्हार तालुक्यात महिला व बाल हक्क कल्याण समिती दौऱ्यातील ४ महिला आमदारांनी भेट देऊन या भागातील महिलांच्या समस्या,महिलांसाठीच्या योजना व सोयी सुविधांची पाहणी केली.संपूर्ण पालघर जिल्हा दौरा होणार असून या साठी २ टीम तयार करण्यात आल्या आहेत त्यापैकी जव्हार साठी २ क्रमांकाची टीम आली असून त्यात आमदार मनीषा कायंदे,आमदार लता सोनवणे,आमदार मंजुळा गावित,आमदार गीता जैन यांचा समावेश आहे. महिला व बाल हक्क कल्याण समिती दौऱ्यात समितीने प्रगती प्रतिष्ठानची कर्णबधीर शाळा,कुटीर रुग्णालय,जामसर प्राथमिक आरोग्य केंद्र,भरसटमेट अंगणवाडी,विनवळ आश्रमशाळा, प्राथमिक शाळा वाळवंडा,अंगणवाडी केंद्र वाळवंडा,ग्रामपंचायत रायतळे कातकरी समाजाचे आदिम आवास योजना वसाहत, साखरशेत आश्रमशाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र बरफपाडा शाळा,अंगणवाडी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली.
शिवाय तालुक्यातील महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे किंवा नाही याचा देखील आढावा घेतला व योजना यशस्वीपणे राबिविण्याच्या सूचना केल्या, समाज कल्याण विभाग आरोग्य विभाग,महिला व बाल कल्याण विभाग आदिवासी विकास विभाग,शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग,जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा,शिक्षण विभाग या यंत्रणांचा मागोवा घेण्यात आला.या दौरा दरम्यान लता सानप जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी,जव्हार तहसीलदार आशा तामखडे, गटविकास अधिकारी समीर वाठारकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण पाटील,डॉ.रामदास मराड आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.