
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे अकोट रोडवरील हिंदू स्मशानभूमी कंपाऊंड ग्रील चोरीचे प्रकरण विझले नसतांना दि.१८ एप्रिल २०२२ रोजी हिंदू स्मशानभूमी येथे रात्री आठच्या सुमारास आग लागल्याची माहिती प्राप्त झाली.
प्राप्तमाहितीनुसार स्मशानभूमी मद्धे वृक्षांची संख्या मोठया प्रमाणात आहे.काही अज्ञात व्यक्तींनी कुचारतपणा केले असल्याचे वाहन चालक आशिष कोळखरे व फायरमन मयूर नायडकर यांच्या कडून माहिती मिळाली.घटनास्थळी अग्निशमन जवानांच्या सतर्कतेमुळे मोठे नुकसान टळले.