
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका 29 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामागचं कारणही धक्कादायक असल्याचं दिसतयं. आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव सचिन तळेकर असे असून तो महापालिकेच्या शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. महापालिकेत कामाला लागण्यासंदर्भात एका महिलेनं सचिनसशी संपर्क साधला. कागदपत्रे देत आणि तीन चार जण भेटायला येत असल्याचं महिलेने सचिनला सांगितलं.
मात्र मला फक्त तुम्हालाच भेटायचं आहे, असं सचिन म्हणाला आणि या वाक्यावरुन गैरसमज झाला आणि तीन चार जणांनी सचिनला बेदम मारहाण केली. बेदम मारहाण करत महिलेसमोर नाक घासायला लावल्यामुळे सचिनला त्याचा अपमान झाला वाटलं. हा अपमान सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली. त्यामुळे सध्या ह्याच घटनेची चर्चा सर्वत्र आहे. पोलिसात तक्रार दाखल झाली की नाही हे समजले नाही.