
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नागपूर :- काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापले असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात भोंगे हे आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून आहेत. महाराष्ट्रात तर भाजपची सत्ता असतानादेखील भोंगे होतेच. भाजपशासित राज्यांतील भोंग्यांबाबत मौन बाळगून महाराष्ट्रात आंदोलनाची भाषा सुरू आहे.
सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. मंगळवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, रात्री १० वाजेनंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. या आदेशांचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.