
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला असून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारला घेरलं. यासोबतच राष्ट्रीय सुरक्षेबाबतही मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सुब्रहमण्यम स्वामी यांनी याआधी देखील अनेकदा पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारवर टीका केली आहे.