
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोना पार्श्वभूमीवर फ्रिजमधील पाणी पिऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिक रोड :- आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोना पार्श्वभूमीवर फ्रिजमधील पाणी पिऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचाच फायदा सध्या माठ विक्रेत्यांना झाल्याने माठ विक्रेते आनंदात असल्याचे दिसून येत आहे.तरीही जनतेनी गरबाच्या फ्रीझ कडे लक्ष्य द्यावं. त्यामुळे अनेक बांधवाना रोजगार मिळेल.आता सध्या तरी माठ विक्रीतून चांगला रोजगार हातात पडल्याने तूर्तास तरी पोटाची चिंता मिटली असल्याचे चित्र सध्या सगळ्या शहरात दिसून येत आहे. गरिबांचा फ्रिज समजल्या जाणाऱ्या माठाला सध्या मागणी वाढत आहे.
चैत्र महिन्यात कडक उन्हाळ्यात सर्वत्र शहरीं भागात दुपारी कडक ऊन, रात्री उकाडा जाणवू लागला आहे. सहसा रस्ते निर्मनुष्य असतात. माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होते. फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने सर्दी, पडसे, शिंक यांची लागण व्हायला याच काळात जास्त प्रमाणात सुरवात होते. डॉक्टरदेखील उन्हाळ्यात नैसर्गिक थंड पाणी पिण्यास सांगतात. उन्हाळ्यात फ्रिजचे पाणी पिणे टाळा, असे आरोग्य विभागाने सांगितलेले आहे. सध्या कोरोना संसर्गजन्य आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फ्रिज ऐवजी लोक आता माठाला पसंती देत आहे.
काळे, लाल, वेगवेगळ्या आकार, रंगातील माठ, दही जमवण्यासाठी लागणारी मातीची लहान मोठी हंडी, मातीची पाण्याची बाटली, मातीचा तवा, चमचे यांना चांगली मागणी आहे. माठच्या किमती १५० ते ४०० रुपये, लहान हंडी २०० रुपये, मातीची बाटली २५० रुपयांना मिळत आहे. जीवनावश्यक कामासाठी बाहेर पडलेले नागरिक आवर्जून रोडवर थांबून माठ व इतर साहित्य खरेदी करीत आहे. थंड पाण्यासाठी घरोघरी माठ हवेच असतात, याच काळात माठ व इतर तत्सम वस्तू खरेदी करण्याला ग्राहक पसंती देतात.