
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजुर्डे पाटिल
गंगापूर :- गेल्या अनेक दिवसापासून गंगापूर शहरात अनेक भागात पाणीपुरवठा बंद असल्याने व जवळपास शहरात 12- 12 दिवस पाणी येत नसल्याने व शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने गंगापूर नगरपालिकेच्या भ्रष्ट ढिसाळ कारभाराच्या विरोधात कायगाव येथे गोदावरी नदीवर गंगापूर शहरातील MiM कार्यकर्त्यांनी बकेट घेऊन अंघोळ आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे. गंगापूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
अनेक महिन्यापासून गंगापूर शहरात गेल्या पाणीपुरवठा अभियंता गैरहजर असल्याने व शहरातील पाणीपुरवठा नियोजन ढिसाळ असल्याने शहरात तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
याबाबत नगरपालिकेला 25 ऑगस्ट 2021 व तसेच 22 नोव्हेंबर 2021 , 27 डिसेंबर 2021 रोजी गंगापूर तहसीलदार यांना पाण्याबात निवेदन देण्यात आले त्यानंतर 11 /2/ 2022 रोजी उपविभागीय अधिकारी (SDM)वैजापूर यांना निवेदन देऊन पाणी टंचाई सुरळीत करून पाणीपुरवठा अभियंता श्री व्यवहारे यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यांनतर ऐन उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,भगवान महावीर जयंती, भगवान रामनवमी, हनुमान जयंती, अशा उत्सवा मध्ये पाणीपुरवठा बंद असल्याने व तसेच रमजानचा उपवासाचा पवित्र महिन्यातही पाणीपुरवठा बंद असल्याने शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वण-वण भटकावे लागत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून शहरातील विविध वार्डातील नागरिक हे पाण्यासाठी गंगापूर नगरपालिकेत चकरा मारत असून याबाबत गंगापूर नगरपालिकेकडून पाण्याबाबत कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे ऐन कडक उन्हाळ्यात गंगापूर शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय हाल-अपेष्ठा सोसाव्या लागत आहे. शहर वासीयांना पिण्यासाठी पाणी नसल्याले गंगापूर नगरपरिषदेच्या प्रशासन व पाणीपुरवठा अभियंता विरोधात तीव्र संताप नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात आहे.
या गंगापूर नगरपालिकेच्या ढिसाळ प्रशासन व पाणीपुरवठा अभियंता च्या विरोधात सकाळी 10 वाजता AiMiM पक्षाच्या वतीने कायगाव येथील गोदावरी नदीवर बकेट (बादली) घेऊन MiM पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गंगापूर नगरपालिकेच्या भोंगळ भ्रष्ट कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी अनोखे अंघोळ आंदोलन करून संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. या अंघोळ आंदोलनात ता. अध्यक्ष राहुल वानखेडे, शहर अध्यक्ष फैसल बासोलान, ता.संघटक वैभव खाजेकर, युवा शहर अध्यक्ष नदीम खान, शहर सचिव इम्रान खान, सरवर जहुरी, मूबिन शेख, मोहसीन शेख, आदींनी सहभाग नोंदवीला .