
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलुर :- दिनांक १९ मंगळवारी रोजी शहापुर खानापुर विभागातील कोटेकल्लूर, लिंबा आदी ४ गावात येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर या महामानवाच्या जयंती निमित्त व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या आदेशानुसार नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आरोग्य तपासणी शिबिराचा आज १५वा खानापुर व शहापूर विभागातील शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नागनाथ वाडेकर, तालुका प्रमुख महेश पाटील, उप तालुका प्रमुख व्यंकटरेड्डी आलूरे, ब्रम्हानंद रेड्डी याल्लावार, युवा विभाग गायकवाड दिपक, युवासेना उपतालुकाप्रमुख गायकवाड अंकुश प्रमुख, गंगारेड्डी चामावार नारायण पोतदार गांधी सायन्ना कनकंटे पंस. समिती कोटेकललूर, शिवसेना शाखाप्रमुख संतोष कुलकर्णी, लिंबा येथील शिवसेना शाखाप्रमुख गुत्ते प्रकाश सरपंच व उपसरपंच मोतेवार संजय आदी मान्यवर उपस्थित होते