दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे गुरुवार 21 एप्रिल 2022 रोजी शिकाऊ उमेदवारासाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात पाचवी, दहावी, बारावी, पदवीधर व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारासाठी नामांकित कंपनीच्या आस्थापनातील 540 अंदाजीत पदासाठी रोजगाराची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध होणार आहे.
मेळाव्यास येताना सेवायोजन कार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड,तळ मजला रुम नं.27 नंदुरबार (02564-295801) तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जी.टी.पी कॉलेज रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा. या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने सहायक आयुक्त यांनी केले आहे.