दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- लोहयात शिवा संघटनेच्या वतीने समतेचे पुरस्कर्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले असून महात्मा बसवेश्वर जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते बाबाराव धोंडीबा शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा शहरात शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती दरवर्षी शिवा संघटना लोहा तालुका शाखेच्या वतीने करण्यात येते. गेली दोन वर्ष कोरोना काळात महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणूक शासनाच्या अटी व नियमामुळे काढण्यात आली नाही.
आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य शासनाने दि. १ एप्रिल पासून सर्व अटी व नियम शिथिल करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे यंदा महात्मा बसवेश्वर जयंती लोहा शहरात मोठ्या धुमधडाक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून व भव्य मिरवणूक काढून साजरी करण्यात येणार आहे. या नियोजित महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त आज दि.१९ एप्रिल रोजी लोहा शहरातील हाॅटेल शिव लंच येथे बैठकीचे आयोजन शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
यावेळी प्रथम महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व नंतर महात्मा बसवेश्वर जयंती मंडळाच्या कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्ष बाबाराव धोंडीबा शेटे ,यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष -बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष- माऊली पाटील पवार, लकी फुलवरे सरचिटणीस चंद्रकांत बेंद्रे मुख्य संघटक आपाराव राजळे कोषाध्यक्ष-राजु शेटे सल्लागार-मारोतराव सोनवळे कालीदास मुस्तापुरे प्रसिद्धी प्रमुख – विलास सावळे बाळासाहेब कतुरे शिवराज दाढेल माधव भालेराव हारी वड आदीची बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली. लोहयात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती शिवा संघटनेच्या वतीने दि.11/5/2022 रोजी बुधवारी धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे.
यावेळी या बैठकीला शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहार धोंडे सर लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी देऊळगाव चे सरपंच मारोती सोनवळे कालीदास मुस्तापुरे राजु माहागावकर बालाजी मानसपुरे लक्ष्मण काजले लोहा तालुका अध्यक्ष हांनमत भाऊ लांडगे शिवा उद्योग आघाडीचे मानसपुरे धर्मवीर संघटनेचे बाळासाहेब जाधव छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार बहुसंख्येने शिवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.