
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
नांदेड :- श्री शिवाजी जुनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड येथील- लेखिका प्रा.स्वाती कान्हेगावकर यांच्या “पोपट उडाला भूर्रर”या बाल कादंबरीचे प्रकाशन मराठी साहित्य संस्कार मंडळ आयोजित पहिल्या साहित्य संमेलनात वाकोडी येथे थाटामाटात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण कवी शंकर वाडेवाले तर उद्घाटक म्हणून कादंबरीकार बाबाराव मुसळे हे होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संकुलाचे प्रा. केशव सखाराम देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे यांची उपस्थिती होती.
यानिमित्ताने श्री शिवाजी जुनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड तेथे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी शालेय समिती सदस्य मा. सूर्यकांत कावळे, प्राचार्य अॅड सुधीर कुरुडे, उपप्राचार्य परशुराम येसलवाड, पर्यवेक्षक सदानंद नळगे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. मुरलीधर घोरबांड, मा. पंढरीनाथ काळे, मा. समर्थ लोखंडे, श्री राजेन्द्र ब्रम्हे, डॉ. वेदांत ब्रम्हे यांची उपस्थिती होती.