दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे
शाम पुणेकर
पुणे :- विविध विषयांवरील व्याख्यानां मधून दर्जेदार वैचारिक व मनोरंजक मेजवानी देणारे ‘वसंत व्याख्यानमाला’ हे व्यासपीठ पुणे शहराची शान असून त्याला जागतिक पातळीवर ख्याती प्राप्त झाली आहे. अद्याप पर्यंत ह्या व्यासपीठाचा करोडो रसिक श्रोत्यांनी लाभ घेतला आहे. कोरोनाच्या निर्बंधामळे प्रदीर्घ काळ थांबल्या नंतर आता “युक्रेन युध्द : भारताने काय शिकावे?” या विषयावरील ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांच्या प्रथम व्याख्यानाने ह्या व्याख्यानमालेची सुरूवात उद्यापासून होत आहे. १ ते १० मे या कालावधीत नेहमी प्रमाणे टिळक स्मारक मंदीर येथे ही व्याख्यानमाला होईल असे सभेचे प्रमुख डाॅ. जयंत टिळक यांनी सांगितले. २१ ते ३० एप्रिल आणि ११ ते २० मे दरम्यान ही व्याख्यानमाला आॅनलाईनही होईल, असे सभेचे प्रमुख कार्यवाह डॉ. मंदार बेडेकर यांनी स्पष्ट केले.