
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- एका बांधकाम व्यावसायिकाची 6 कोटी 24 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात पतीचा नियमित, तर पत्नीचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांनी फेटाळला. सचिन हनुमंत थोरात आणि पत्नी सुप्रिया (दोघेही, रा. आकुर्डी) अशी जामीन फेटाळलेल्या दोघांची नावे आहेत. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी जामिनास विरोध केला. याबाबत 37 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने दिघी पोलिसात फिर्याद दिली आहे. 2014 ते 2020 या कालावधीत हा प्रकार घडला.
डूहूळवाडी मोशी येथील बांधकाम प्रकल्पावर बुकिंग केलेल्या फ्लॅटवर कमिशन देण्याच्या अटीवर पती-पत्नी काम करत होते. दोघांनी परवानगीशिवाय सदनिकाधारकांकडून रोख स्वरूपात २८ लाख स्विकारले. तर, बनावट कागदपत्राद्वारे फिर्यादींच्या कंट्रक्शनचे चिंचवड येथील एका बॅंकेत चालू खाते सुरू केले. त्यावर नऊ कोटी ५७ लाख रुपये जमा केले. त्यापैकी ३ कोटी ६० लाख रुपये फिर्यादींच्या वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले. सचिन या आरोपीस पत्नीसह न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे.