दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- केंद्र सरकारने अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या सुटकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उत्तर दिले आहे. पोर्तुगीज अधिकाऱ्यांना अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमबाबत दिलेल्या आश्वासनाचे पालन करण्यास भारत सरकार बांधील आहे आणि योग्य वेळी त्याचे पालन केले जाईल, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.
जास्तीत जास्त २५ वर्षांची शिक्षा गँगस्टर अबू सालेमला देण्याचे आश्वासन पूर्ण केले जाईल, असे केंद्रीय गृहसचिवांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. पोर्तुगाल सरकारला हे आश्वासन तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी सालेमच्या प्रत्यार्पणाच्या वेळी दिले होते.