
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
दिल्ली :- देशात ज्या प्रकारे हिंसक घटना घडत आहेत, त्यावरुन देश कोणत्या दिशेने चालला आहे. हे सर्वांना माहित झाले आहे. देशात भयानक धोरण सुरु आहे. देशवासियांना ते समजून घ्यावे लागेल.हिंसा रोखने हे सत्तेत असलेल्या पक्षाचे नेहमी काम असते. मात्र येथे उलटी गंगा वाहत आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देशात सुरु असलेल्या हिंसक घटनेवरुन नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. गेहलोत हे आज बुधवारी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.