
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड :- माणिक नगर नांदेड येथील श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेडच्या राज्यशास्त्र विषयाच्या विभाग प्रमुख तथा कुठल्याहीह कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या प्रा.सौ.दीपा जामकर यांचे यजमान (पतीदेव) मराठी विषयाचे गाढे अभ्यासक प्रवचनकार तथा कीर्तनकार व साहित्यिक प्रा. धाराशिव शिराळे यांना डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेतर्फे दिला जाणारा “महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाल्यामुळे कॉलेज प्रशासन आपल्या दारी या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापक धाराशिव शिराळे व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रा. सौ. दीपा शिराळे (जामकर) यांचा हृदय पूर्ण सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी कॉलेज प्रशासन आपल्या दारी या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून श्री शिवाजी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माणिक नगर नांदेड चे शालेय समिती सदस्य माननीय सुर्यकांत कावळे , शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य एडवोकेट सुधीर गुरुनाथराव कुरुडे , उपप्राचार्य परशुराम येसलवाड , माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक माननीय सदानंद नळगे , ज्युनिअर कॉलेज चे परीक्षा विभाग प्रमुख प्रा.मुरलीधर घोरबांड, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक पंढरीनाथ काळे तसेच दैनिक चालू वार्ताचे नांदेड प्रतिनिधी समर्थ दादराव लोखंडे इत्यादीं मान्यवरानी कॉलेज प्रशासनाच्यावतीने हृदय पूर्ण यथोचित सत्कार व अभिनंदन करून प्राध्यापक धाराशिव शिराळे व प्रा.सौ. दीपा शिराळे (जामकर) यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.