
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड :- माणिक नगर नांदेड येथील श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेडच्या हिंदी विषयाच्या विभाग प्रमुख तथा कॉलेजचे भूषण असलेल्या आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (उच्च माध्यमिक विभाग) हिंदी अभ्यास मंडळाच्या सदस्या प्रसिद्ध साहित्यिक प्रा.सौ.स्वाती राजेंद्र ब्रम्हे (कान्हेगावकर) यांच्या ” पोपट उडाला भूर्रर ” या बालकथा संग्रहाचे दि. 18 एप्रिल 2022 रोजी वाकोडी जिल्हा हिंगोली येथील मराठवाडा साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते मोठ्या थाटामाटात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
तसेच प्रसिद्ध साहित्यिक प्रा.सौ.स्वाती राजेंद्र ब्रह्मे (कानेगावकर) यांचे चिरंजीव डॉक्टर वेदांत राजेंद्र ब्रह्मे यांना वैद्यकीय क्षेत्रातील बी.डी.एस. पदवी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रदान केल्या मुळे डॉक्टर वेदांत ब्रम्हे यांचे व वेदांतचे आई प्रसिद्ध साहित्यिक प्रा.सौ.स्वाती राजेंद्र ब्रह्मे (कान्हेगावकर) या दोघांचाही कॉलेज प्रशासन आपल्या दारी या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून श्री शिवाजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माणिक नगर नांदेड चे शालेय समिती सदस्य माननीय सुर्यकांत कावळे , शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य एडवोकेट सुधीर गुरुनाथराव कुरुडे , उपप्राचार्य परशुराम येसलवाड , माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक माननीय सदानंद नळगे , ज्युनिअर कॉलेज चे परीक्षा विभाग प्रमुख प्रा.मुरलीधर घोरबांड, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक पंढरीनाथ काळे तसेच दैनिक चालू वार्ताचे नांदेड प्रतिनिधी समर्थ दादराव लोखंडे इत्यादींनी मान्यवरानी वेदांत ब्रह्मे आणि प्रसिद्ध साहित्यिक प्रा. सौ.स्वाती कानेगावकर यांचा कॉलेज प्रशासनाच्यावतीने हृदय पूर्ण यथोचित सत्कार व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.