दैनिक चालू वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी शहर प्रतिनिधी,
पुणे-खडकीत कॅन्टोन्मेंट बोर्ड आस्थापनेत सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने दैनिक चालू वार्ताचे पत्रकार परमेश्वर वाव्हळ यांचा वाढदिवस अर्थात अभिष्टचिंतन सोहळा हा सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान या अभिष्टचिंतन सोहळ्यास या आस्थापनेचे सुरक्षारक्षक कर्मचारी पर्यवेक्षक मा. किरण बिरांजे उपस्थित होते. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देतांना ते म्हणाले की, आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस असून, विजया दशमीच्या मुहूर्तावर व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने हा अभिष्टचिंतन सोहळा आपण साजरा करत आहोत. खरेतर हा वाढदिवस साजरा करण्याचा मानस आहे की, राज्यातील नोंदणीकृत सुरक्षारक्षकांचे प्रलंबित प्रश्ननं, समस्या, गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या आहेत. त्याला वाचा फोडण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून पत्रकार वाव्हळ यांनी वाचा फोडण्यासाठी फार महत्त्वाचे प्रयत्न केलेले आहेत. म्हणून अशा उमेदी व्यक्तींचा सन्मान आमच्या वतीने व्हावे, अशी आमची मनापासून इच्छा होती.ती आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण केल्याचे समाधान आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना आहे. असे त्यांनी शुभेच्छा देताना सांगितले. दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश भुजबळ यांनी केले.तर आभार प्रदर्शन राहुल पाटील यांनी मानले.या अभिष्टचिंतन सोहळ्यास भुषण धोत्रे, किशोर शिंदे, सतीष धंनतोलीया, विकास पाईकराव हरिष शेलार, शैलेश चव्हाण, शांताराम हरगुडे, सुधीर गायकवाड, प्रशांत घाडगे, जयदीप कुलकर्णी,अजय वीरकर,मोमीन सैफ, साळवी मॅडम, नेटके मॅडम,वर्षा मॅडम यांच्या सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.