
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधि
मारोती कदम
नांदेड :- दिनांक 20 एप्रिल रोजी राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय सगरोळी या ठिकाणी शाळेचे कमांडंट श्री KVR राव प्राचार्य श्री धनंजय वकील सर यांच्या शुभहस्ते येलो बेल्ट वाटप केले व अभिनव कदम ,अभिनव भिंगेवार ओमकार वंगल ,निखिल धनराज खिल्लारे, प्रथमेश कदम ,अभिषेक भिंगेवार, ऑरेंज बेल्ट धनराज पाचरे ,शिवांक गट्टेवार ,ग्रीन बेल्ट अनमोल यालावार, दीपक चीलकेवार, यांना बेल्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माननीय प्रमोद देशमुख डॉक्टर जैवंत जकाते, शाळेचे उपप्राचार्य ठाकूर सर, क्रीडा प्रमुख एम. बी .कुलकर्णी, गणेश कळकेकर, अशोक भिसे ,व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले व पुढील परीक्षेसाठी व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशी माहिती कराटे प्रशिक्षक एकनाथ पाटील यांनी दिली आहे.