
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
सध्या भारत देश इस्लामविरोधी अजेंड्यामधून प्रवास करत आहे काय? असा प्रश्न जनमनात विचारला जात आहे. ट्रिपल तलाक, मंदिर-मस्जिद,गोहत्या,पेलेट गन -कश्मीर, हिजाब, मस्जिदवरील भोंगे,लव जिहाद वगैरे रोजच नव्या मुद्द्यांना हात घालून काही वर्तमान राजकारणी इस्लामोफोबिया (Islamophobia) पसरवू इच्छित आहेत किंवा या मुद्द्यांना आधार बनवून देशात असलेली बेरोजगारी, बेकारी, महागाई,महिलांची दास्यता,आदिवासींचे विस्थापन,भ्रष्टाचार याबाबत वर्तमान केंद्र सरकारला आलेले अपयश लपवू इच्छित तर नाही ना?असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
भारतीय संविधानाने सर्व जाती धर्म पंथाच्या नागरिकांना त्याचे मूलभूत हक्क अधिकार बहाल केलेले असताना त्या अधिकाराचा संकोच होईल असे वर्तन सध्या पुढारपण करणारे काही डोक्यावर पडलेले लोक करीत आहेत. आज आपण २१ व्या शतकात जगत असताना ज्या गोष्टी मोडीत काढायला पाहिजे त्या गोष्टीला आधार बनवून सामान्य लोकांना धर्माची गुंगी देऊन त्यांच्या हक्क अधिकाराबाबत बधीर करण्यात आग ओकणाऱ्या संघटनेला मोठ्या प्रमाणात यश आलेले आहे.
जगाचा इतिहास ज्या वेळी लिहिला जाईल त्यावेळी इतर देश प्रगतीच्या वाटेवर असताना भारत देशातील राजकारणी हिंदू-मुस्लिमवर राजकारण करीत होते असाच इतिहास भारत देशाबद्दल कथिला जाईल यात शंका नाही. या दृष्टिकोनातून भारताचा अभ्यास केला असता मध्ययुगीन भारतात शासक जातींच्या लोकांनी त्यांच्या राज्यकारभार चालवत असताना धर्मात लुडबुड केली नव्हती असे चित्र आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आपले पिता छत्रपती शहाजी राजे यांच्यासोबत विजापूरला वास्तव्यास असताना बादशाह आदिलशाहा यांच्या दरबारात जाताना वाटेत कसायांची दुकाने लागत. त्यात कच्चे गोमांस व गुरांच्या मुंड्या विकावयास मांडून ठेवलेल्या असत.
त्याचप्रमाणे शिजवलेले मांस विक्रीसाठी वाटेवर ठेवलेले असे.हा प्रकार पाहून शिवाजी महाराजांना अतिशय वाईट वाटत असे. त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांना याबाबत आदिलशाहास तक्रार करण्यास सांगितले.शहाजी राजांनी सदरील प्रकार पाहून बादशाहीत अर्ज केला.या अर्जावर आदिलशाहाने शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याच्यावर योग्य विचार करून हुकूम दिला की,’शहरात आजपासून कोणीही गोवध करू नये किंवा गोमांसाची दुकाने मांडू नयेत.हा हुकूम मोडणाऱ्यास मोठे शासन होईल.
हिंदू धर्माविरुद्ध हा प्रकार असल्याने त्यांच्या देखत कोणी गोहत्या केली किंवा वाटेत गोमांस विकावयास मांडले आणि त्यास कोण्या हिंदूने ठार मारले तरी त्याची दाद सरकारात मिळणार नाही,’ असा सक्त हुकूम चोहीकडे जाहीर करून शहराच्या दक्षिण बाजूस दूर एके ठिकाणी कसाईपुरा बसविला व तेथें सर्व कसायांस जाऊन राहावयास हुकूम केला होता. इतकेच नव्हे तर शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांचा विवाहाचा विवाद चालू असता खुद्द बादशाह निजामशाह याने मध्यस्थी करून लखुजीराव जाधव यांना जिजाऊ यांना मालोजीराजेंची सून आणि शहाजी राजेंची पत्नी म्हणून मान्यता द्यावी यासाठी प्रवृत्त केले तसेच दोघांचा विवाह दौलताबादेस त्याच्या समक्ष करविला.
ही गंगा-जमनी तहजीब तत्कालीन शासक लोकांनी जपली होती.
ज्यावेळी मालोजीराजे यांना मुलबाळ होत नव्हते तेव्हा त्यांनी अहमदनगर स्थित शाहशरीफ पीर दर्गा येथे जाऊन फकीरांना खैरात वाटली.त्यानंतर दोन अपत्य प्राप्ती झाल्यानंतर त्यांची नाव शाहजी आणि शरीफजी असे ठेवले होते.तेव्हा तत्कालीन मराठा सरदारांना इस्लाम बाबत कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती कारण इतर धर्माचा आदर हाच विचार त्यांच्या ठायी होता. स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेता असणारा यवनद्वेष मावळतीला जाऊन छ. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिकांना मानाचे स्थान दिले.
अनेक किल्ल्यावर नमाज अदा करण्यासाठी मस्जिद बांधली. बाबा याकूत सारखे मौलवी यांना गुरुस्थानी मानले.आपल्या धर्मनिरपेक्षतेची साक्ष त्यांनी वेळोवेळी दिली. त्यांच्या अंगरक्षकात मुस्लिम लोक जास्त संख्येने होते. मात्र छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचा इतिहास सांगून तरुणांची माथी भडकवली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणून छद्म बिरुदावली लावणाऱ्या आणि त्यांच्या सुसंस्कृत वागण्याला ‘सद्गुण विकृती’ म्हणणाऱ्या मतलबी आणि अधम लोकांनी शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा विपर्यास समाजात पसरविला.
महाराज हिंदू होते पण हिंदुत्ववादी कधीच नव्हते. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या राज्यात अठरापगड जातीची सगळी माणसे सारख्याच न्यायाने वागवली जात होती. त्यांनी तर ब्राम्हणांचाही मुलाहिजा ठेवलेला नव्हता. त्यांनी फक्त हिंदुत्वासाठी लढा दिला असता तर त्यांच्या सैन्यात मुसलमान सरदार कधीच असू शकले नसते. छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई ही धार्मिक स्वरूपाची नव्हती तर ती राजकीय लढाई होती आणि या लढाईत त्यांनी धर्म येऊ दिला नाही. म्हणूनच अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर ‘मरणांते वैराणी’ या न्यायाने त्याची कबर बांधण्याची आणि तेथे दिवाबत्ती लावण्याची त्यांनी व्यवस्था केली होती.
त्याच वेळेला त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांची गय केली नव्हती हा इतिहास जनता विसरलेली नाही.
ज्या ज्या वेळी स्वकीयांनीच शिवाजी महाराजांवर तलवारी उपासल्या, तेव्हा ते वार आपल्या छातीवर झेलणारे वीर मुस्लिम मावळेच होते, हा इतिहास नाकारता येणार नाही. छत्रपतींनी न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारलेले निधर्मी राज्य निर्माण केले होते. महाराजांचा लढा हा राष्ट्रीयत्वाचा होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी खोटे समज आणि चुकीचा भ्रम पसरवणे बंद करणे ही प्रत्येक जागृत माणसाची जबाबदारी आहे. शिवाजी राजांना हिंदुत्वाच्या संकुचित डबक्यात कुजवून नतद्रष्ट धर्मांधतेच्या नीच पातळीवर त्यांना खाली ओढून त्यांचा अपमान करणारे आता हुडकून काढले पाहिजेत.
त्यांचे एकसंघ भारतीय समाजात फूट पाडण्याचे मनसुबे उधळून लावले पाहिजेत.यासाठी आपला वैचारिक लढा अधिक तीव्र करायला पाहिजेत.bडॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या एका भाषणात असे म्हणतात की “अल्पसंख्यक एक विस्फोटक तत्व होते है और अगर वे किसी दिन फट पड़े तो सरकार की धज्जियां उड़ा सकते है”, ” बहुसंख्यको का कर्त्तव्य है कि अल्पसंख्यको के प्रति सौतेला व्यवहार न करे”,”जब बहुसंख्यक समुदाय सौतेला व्यवहार करना छोड़ देगा तो अल्पसंख्यक नाम की कोई चीज ही नही रह जाएंगी”।
आज प्रकर्षाने राहत इंदोरी साहेबांची रचना खूपच प्रासंगिक वाटते..
अगर खिलाफ हैं, होने दो, जान थोड़ी है
ये सब धुँआ है, कोई आसमान थोड़ी है
लगेगी आग तो आएंगे घर कई ज़द्द में
यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है
मैं जानता हूँ की दुश्मन भी कम नहीं लेकिन हमारी तरह हथेली पे जान थोड़ी है,
हमारे मुंह से जो निकले वही सदाक़त है
हमारे मुंह में तुम्हारी जुबां थोड़ी है
जो आज साहिब-इ-मसनद है कल नहीं होंगे किराएदार है जाती मकान थोड़ी है
सभी का खून है शामिल यहाँ की मिटटी में किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है
संदीप नाग
मंठा समुह