
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
नांदेड :- १२ व्या शतकातील थोर समाज सुधारक व समतेचे पुजारी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या नांदेड शहरातील अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा दि. २२.एप्रील २०२२ रोजी सायं.५ : ०० वा करण्यात येणार आहे. या बाबतची पुर्वतयारी म्हणुन मुखेड येथील शासकीय विश्राम गृहात ग्रामीण व शहरी भागातील लींगायत बांधव,पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते. या बैठकीस जि.प.चे मा.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, महापालीकेच्या स्थायी समीतीचे मा. किशोरजी स्वामी,जि.प.चे मा.शिक्षण व बांधकाम सभापती संजयजी बेळगे,काँग्रेसचे नांदेड प्रवक्ते संतोष पांडागळे, कंधार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे,जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांनी आपल्या भाषणातुन आपली मनोगत व्यक्त केलीत व जास्तीच्या संख्येने या पुतळा लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
महात्मा बसवेश्वर पुतळा लोकार्पण ठिकाणी मुखेड येथुन मा.आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर* यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वाहने करुन जास्तीच्या संख्येने लिंगायत बांथव व काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मा. ना.अशोकराव चव्हाण साहेबांच्या आवाहनाला साद घालत उपस्थित राहतील असे सांगीतले,चाकोरीबध्द नियोजन करून अशा भव्य दिव्य लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहनही जि.प.चे मा.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी केले आहे.
या पुर्व तयारी बैठकीसाठी मार्केट कमीटीचे मा.उपसभापती शिवलीग पाटील कामजळगेकर,रामराव पाटील,जि.प.मा.सदस्य बालाजी बंडे,येवतीचे मा.सरपंच विजय पाटील,जि.प.मा.सदस्य जीवन दरेगावे,नंदगावचे मा.सरपंच हौगीराव पाटील,सुभाष तांबोळी,सुगाव कॅम्प येथुन अरूण पत्रे सर,शिवकुमार गंदीगुडे, बेळी येथुन सुनिल आरगिळे,कर्णा येथुन विद्याधर साखरे,होकर्णा येथुन बालाजी बोमनाळे, जिरगा येथुन सुनिल तरगुडे,थोटवाडी येथुन मारोती पाटील,हंगरगा येथुन राजु पाटील,भिमराव पाटील,हिप्परगा येथुन बालाजी वारे,सलगरा येथील सरपंच कापसे, मुखेड येथुन शिवकांत मठपती,कॉंग्रेस जिल्हा प्रवक्ते दिलीप कोडगिरे,मजुर फेडरेशनचे संचालक शौकत पठाण,मा.नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार मडगुलवार,यु. कॉ.अध्यक्ष संतोष बोनलेवाड,मजुर फेडरेशनचे मा.चेअरमन हेमंत घाटे,मा.नगरसेवक हणमंत नारनाळीकर, बेळीचे सरपंच नागनाथ पाटील जुन्ने,विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल गायकवाड, शहर काँग्रेसचे सरचिटणीस रामेश्वर पाटील ईंगोले, बेळीचे मा.उपसरपंच सुरेश पाटील बेळीकर,बालाजी साबणे,बालाजी वाडेकर,सह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी,लिंगायत समाज मोठया प्रमाणात उपस्थित होता.
या लोकार्पण सोहळ्याच्या पुर्वतयारीच्या बैठकीचे प्रास्ताविक बालाजी बंडे यांनी केले तर सर्वांचे आभार हणमंत नारनाळीकर यांनी मांडले.