
दैनिक चालु वार्ता
आर्णी प्रतिनिधी
श्री, रमेश राठोड
आर्णी :- आर्णि तालुक्यातील मौजा.उमरी कापेश्वर येथील शेतमजुर प्रमोद सिताराम नेवारे शेतात काम करतांना ११ के.व्ही. सप्लाय करणारी खांबवरील विघुत तार तुटून अंगावर पडल्याने त्यात तो शेतमजुर युवक गंभीर भाजला गेला. यानंतर त्याला यवतमाळ आणि नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. ऑपरेशन झाल्यानंतर डावा हात आणि उजव्या हाताचा अंगठा तोडण्यात आले. आज तो शेतमजुर शेवटच्या घटका मोजत असताना अद्यापही वीज वितरण कंपनीने आर्थिक मदत तर लांबच पण साधे भेटण्याचे सौजन्य न दाखवल्याने परिसरातील नाजरिकांमध्ये वीज वितरण कंपनी विरोधात संताप व्यक्त केल्या जात आहेत. कोणतीही मदत नाही.
उमरी कापेश्वर येथील शेतकरी मालक संदिप उपलेंचवार आणि शेतमजुर प्रमोद नेवारे हे दोघे २५ फेब्रुवारीला सकाळी जनावरांकरीता लावलेल्या सोलर बॅटरीच्या तारावर ११ के.व्ही. घुत वाहिनीची चालू तार खांबावरून तुटल्याने त्यात दोघांचा अपघात झाला. लागलेल्या आगीत शेतमालक संदिप उपलेंचवार याचा एका हाताचा अंगठा कापण्यात आला. मात्र उपलेंचवार यांच्या शेतात काम करणाऱ्या प्रमोद नेवारे हा प्रचंड भाजल्याने त्याचा एक हात आणि दुसऱ्या हाताचा अंगठा कापल्याने त्याला कायमाचे अपंगत्व आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रमोद हा शेवटचा घटका मोजत असून देखील वीज वितरण कंपनीने त्याला कोणतीच आर्थिक मदत केलेली नाही. घरात डोळ्यांनी आणि शरीराने थकलेले आई– वडिल व एक लहान भाऊ सध्या प्रमोदला अपंगत्व आल्याने हतबल झाले असून प्रमोद हा घरातील करताहर्ता आहे