
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर पुढील काही दिवसांत काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
एएनआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. प्रशांत किशोर उद्या यासंदर्भात पक्ष नेतृत्त्वाशी संवाद साधतील. गेल्या काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी अनेकदा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली आहे.
काँग्रेसला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी काही उपाय सुचवले आहेत. सोनिया गांधी आणि पक्षाचे काही वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी या संदर्भात एक प्रेझेंटेशन सादर केलं. या प्रेझेंटेशनमध्ये ६०० स्लाईड्स होत्या. किशोर यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीला उपस्थित असलेल्या एकाही व्यक्तीनं ६०० स्लाईड्स पाहिल्या नाहीत. या सर्व स्लाईड्स किशोर यांनी तयार केल्या होत्या.