
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
भाजप नेत्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर राऊत यांनी न्यायालयावर अवमानकारक आरोप केले होते. याचसंदर्भात ‘भारतीय बार असोसिएशन’ने आता कायदेशीर भूमिका घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर खोटे, निंदनीय आणि अवमानकारक आरोप केल्याबद्दल संजय राऊत आणि इतरांविरूद्ध अवमान याचिका आणि जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय दिल्यानंतर राऊत यांनी न्यायाधीशांवर आणि न्यायव्यवस्थेवर आरोप केले होते, त्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.