
चालु वार्ता वार्ता
दौंड प्रतिनिधी
अरुण भोई
राजेगाव दौंड :- दिनांक २९एप्रिल २०२२ रोजी ठीक सकाळी साडेअकरा वाजता “दौंड तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष” च्या वतीने “रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा’ चे उद्घाटन” शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष याचे “-संस्थापक, माननीय, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित वैद्यकीय कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क समन्वयक राजाभाऊ भिलारे, वैद्यकीय कक्षाचे दौंड विधानसभा संपर्क समन्वयक आदिराज कोठडीया, जिल्हा समन्वयक शरद बाप्पू सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख महेश पासलकर, उपजिल्हाप्रमुख अनिल तात्या सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होते.
तसेच दौंड तालुका -शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख, सर्व पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी ,उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख उपस्थित होते व डॉ प्रमोद रंधवे तालुका समन्वयक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष दौंड अमोल दादा जगताप शहर प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष.असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. बरंगाळे व कार्यकारी सदस्य डॉ. रोहन खवटे, दौंड तालुका सहाय्य्क समन्व्यक शैलेश पिल्ले, लक्ष्मण सरोदे, रमेश मोघे, आप्पा गाडे, रोटी गावचे सरपंच तसेंच ग्रामस्थ, महिला आदी उपस्थित होते.