
दैनिक चालु वार्ता
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
संभाजी गोसवी
पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यांत आली.अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याअगोदर मुंबईत मध्ये विशेष सुधार सेवा येथे सेवा बजावली त्यांनी आज पोलीस आयुक्ताची सूत्रे हाती घेतली कृष्णप्रकाश हे नेहमी प्रकाश झोतात राहण्यासांठी प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांचे प्रकाश झोतात राहणे भोवलयांची चर्चा पोलीस आयुक्त कार्यालयांत आहे. 2 सप्टेंबर 2020 रोजी कृष्णप्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताचा पदभार स्वीकारला होता त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यांआधीच बदली झाली.
तर अंकुश शिंदे हे पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यांत काम करणार असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले त्यांनी याअगोदर गडचोरली ,सोलापूर मुंबई येथे काम केल्यांचे त्यांनी आवर्जून सांगितले सोलापूरमध्ये त्यांनी व्हाइट कॉलर गुन्हेगारीवर त्यांनी आळा घातला होता. अशा आठवणी अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी बोलून दाखविल्या यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना तुम्ही व्हाइट कॉलर गुन्हेगारीवर आळा घालणार का? असा प्रश्न विचारताच सगळं करू असा सूचक इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला.