
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी
बापु बोराटे
इंदापूर :- शेटफळ तलावातून उन्हाळी आवर्तन हे 5 तारखेला सुटणार होते ,सुरुवातीला एका वॉल मधून पाणी सोडण्यात आले होते ,दुसरा एका वाॅलचे पाणी सोडताना तांत्रिक अडचणीमुळे उघडला नाही, एका वॉल चे पाणी हे दहा दिवस वाया गेले ,त्यानंतर त्या वाॅलचे पाणी दारे क्रमांक 11 व 12 ला पाणी देण्यात आले , त्यानंतर आम्ही दिनांक 5/4/2022 पासून ते 22/4/2022 पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले ,प्रत्येक वेळेस आज – उद्या पाणी येईल अशी उत्तरे मिळाली ,दि.5/4/2022 ला पाणी न आल्यामुळे आमची पिके जळून चालली आहेत.
त्यामुळे आपणास विनंती आहे की संबंधित वाॅलची दुरुस्ती करून आम्हाला पाणी देण्यात यावे. अन्यथा मी व शेतकरी 25/4/2022 रोजी सोमवार कॅनाल मध्ये उतरून अन्न व पाणी त्याग आंदोलन करणार आहोत, या वर जर पाणी न आल्यास 26/4/2022 रोजी मंगळवारी मी माझा दीड एकर ऊस पिक पेटवून देणार आहे याची नोंद घ्यावी असे युवा नेते पवनराजे घोगरे यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता सो. जलसंपदा विभाग पुणे यांना कळविले आहे.