
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
जळगाव :- दि.२३ .बुलडाणा जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अतिशय मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याचा अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने जळगाव जामोद तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेली ज्वारी, मका,बाजरी,उडीद, मूग, सोयाबीन, आदी ही पिके जमीनदोस्त झालेली होती. नदीकाठ व पाण्याच्या प्रवाहात असलेल्या जमिनी या पिकासह खरडून गेलेल्या होत्या. शेतकऱ्यांच्या पिकांचेपंचनामे करण्याकरिता प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाचे पंचनामे सुद्धा करण्यात आले होते.
सरकारचे लक्ष वेधावे याकरिता शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन सुद्धा देण्यात आली होती. परंतु सहा सात महिन्याचा कालावधी संपून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत कोणतीही मदत जमा झालेली दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले त्याची आर्थिक मदत न करता शासन केवळ शेतकऱ्यांना गाजर घेण्याचे काम करते का?. असा प्रश्न शेतकरी वर्गामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला गाजर पाठवून देण्यात आले.