
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी
अरुण भोई
इंदापूर :- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया इंदापुर तालुका उपाध्यक्ष पदि श्री.युवराज नगरे यांची निवड सामाजिक कार्याची आवड असणारे मा. श्री. युवराज नगरे यांची ख्याती इंदापूर तालुक्यात चांगल्या पद्धतीने पसरलेली आहे. अनेक गरिबांचे, गरजूंची भरपूर पद्धतीने कामे केली आहेत.
दिलखुलास व्यक्तिमहत्वामुळे त्यांना बऱ्याच संघटनेचे जबाबदाऱ्या प्राप्त झालेल्या आहेत. त्यापैकी त्यांना रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया इंदापुर तालुका उपाध्यक्ष पदि निवड झाली आहे. आता ह्या एका नवीन संघटनेने नव्याने चांगले काम करणार व संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहणे हा उद्देश आहे असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित स्वागत व सत्कार केला.