
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- पानावर जेवणाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आता वृक्ष तोड,वृक्ष संवर्धन करणे ही स्थिती लोप पावल्याने, कमी मेहनतीने व कमी कष्टात सध्या यंत्र युगात आमूलाग्र बदल घडून आला आहे.त्यानुसार आता पानांची पत्रावळी दुर्मिळ झाली असून प्लास्टिक पत्रावळीचा वापर लोकप्रिय झाला आहे,यामुळे पर्यावरण समतोल ढासळत चालला असला तरी स्वस्त पर्याय म्हणून लग्न, वाढदिवस,मुंज आणि सार्वजनिक ठिकाणचे भोजन अश्या अनेक ठिकाणी स्वस्त पर्याय स्वीकारले जाऊ लागले आहे,यामुळे ग्रामीण भागातील पानांची पत्रावळी बनवणाऱ्या नागरिकांना आपल्या व्यवसायास मुकावे लागत आहे.
आरोग्याच्या दृष्टीने लाभकारक असलेल्या पानाच्या पत्रावळी नामशेष होण्याच्या मार्गावर असून पानाच्या पत्रावळी ऐवजी प्लास्टिक पत्रावळींनी जागा घेतली असल्याचे दिसून येत आहे.लग्न समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमात जेवणासाठी मोहफूल झाडाची किंवा पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरत असत. यातून पानाच्या पत्रावळी तयार करणाऱ्या ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असे.मात्र अलीकडे पळसाच्या पानाच्या पत्रावळी ऐवजी प्लास्टिक पत्रावळीचा वापर वाढला असून पूर्णतः पानाच्या पत्रावळी गायब झाल्या आहेत.
प्लास्टिक पत्रावळी घेतल्यामुळे पानाच्या पत्रावळी तयार करणाऱ्यांचा उदरनिर्वाह होण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे पाणाची पत्रावळी तयार करणारे ग्रामीण कुटुंब आणि बचत गटांचे व्यवसाय धोक्यात आला आहे आता फक्त पानाच्या पत्रावळीचा उपयोग फक्त देवांना नैवेद्य दाखविण्यासाठीच केला जात आहे. पानाच्या पत्रावळीच्या तुलनेने प्लॅस्टिकच्या पत्र ही अधिक स्वस्त मिळत असल्याने साहजिकच लोकांची ओढ प्लॅस्टिकच्या पत्रावळीकडे जात आहे.त्यामुळे पानाच्या आणि पारंपरिक ग्रामीण भागातील व्यवसाय नष्ट होत आहेत म्हणून उदरनिर्वाहाचे साधन बंद होत चालला आहे.