
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी
बापु बोराटे
इंदापूर :- इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील मयूर चंद्रकांत शिंदे यांनी क्लासिक पॉवरलीफ्टींग या खेळामध्ये सलग दोन वेळा महाराष्ट्राचा स्ट्राँगमॅन हा किताब पटकविला आहे. तसेच केरळ येथील आयोजित झालेल्या नॅशनल क्लासिक पॉवरलिफ्टिंग मध्ये 93 kg गटामध्ये ब्राँझ पदक प्राप्त करून squat – 227.5 kg bench – 180 kg ( Dr . Bench असे यांना ओळखले जाते) Deadlift – 260 kg सर्व वजन 667.5 kg उचलेले आहे . त्यामुळे शेटफळ हवेली हे छोटेसे गाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात झळकले आहे.
मयूर शिंदे च्या यशाबद्दल शेटफळ हवेली ग्रामस्थ व राजवर्धन ग्रुप यांच्या वतीने लवकरच नागरी सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती शेटफळ हवेली गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व राजवर्धन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय (मामा) शिंदे यांनी सांगितले. यावेळी गणेश नवले, संतोष अजिनाथ शिंदे, डॉ.जावेद मुलाणी, गणेश चव्हाण, नितीन चव्हाण, सोमनाथ शिंदे,मयुर कांबळे, संतोष शिंदे,लखन नरबट, महावीर चव्हाण, संदीप कानगुडे,दत्तु मोरे,प्रधुनम शिंदे, सोमनाथ सावंत, रत्नदीप शिवरकर, अतुल येवले, हरिभाऊ शिंदे,दत्तु पवार, संतोष जाधव,दिपक आरडे, सलमान मुलाणी, निलेश गेंड, गणेश टेकाळे, ऋषिकेश गेंड, वैभव शिंदे,प्रदिप काळे, आदी युवक उपस्थित होते.