
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजुर्डे पाटिल
गंगापूर :- अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव असणाऱ्या हिवरे बाजार येथे पदमश्री आदर्श सरपंच पोपटराव पवार यांचुआ हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देण्यात आले.
आ. प्रशांत बंब यांना सरपंच परिषद मुंबई यांच्यावातीने राज्यस्तरीय आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव असणाऱ्या हिवरे बाजार गावचे आदर्श सरपंच पदमश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला यावेळी लोकनेते पारनेरचे आ.निलेश लंके माजी मंत्री बिडचे आ.सुरेश धस यांनाही हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. यावेळी विविध समाजसेवक,लोकप्रतिनीधी,पत्रकार, गांवकरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.