
दैनिक चालु वार्ता
भिगवण प्रतिनिधी
जुबेर शेख
भिगवण(ता.इंदापूर.) :- येथील सर्वात जुनी व भिगवण परिसरात नावलौकिक मिळवलेली भिगवण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था भिगवण या संस्थेची संचालक मंडळाची सन 2021-2022 ते सन 2026-2027 या कालावधीच्या निवडीसाठी 13 जागेकरिता 13 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. काळे यांनी जाहीर केले.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे –
सर्वसाधारण गट :-
बोगावत महेंद्र प्रकाशलाल,भोंगळे रणजित मधुकर,गुणवरे आशिष वामनराव,शिंदे अशोक हरिभाऊ,रायसोनी संजय बाबुलाल, वाघ यशवंत मुकुंदराव,शिरढोणे प्रतिक राजेंद्र,खरड जयप्रकाश रामकृष्ण.
महिला प्रतिनिधी
गांधी अश्विनी कमलेश,शहाणे भारती प्रदीपकुुमार.
इतर मागासवर्ग
जाधव दिलीप बाबासाहेब
भटक्या विमुक्त जाती/जमाती
थोरात बापूराव विठ्ठलराव.
अनुसूचित जाती/जमती
सोनोने नंदकिशोर नारायण.
भिगवण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. भिगवण या संस्थेची स्थापना दिनांक 29/12/1999 रोजी झाली होती.स्थापनेपासून जवळपास 23 वर्षे संस्था भिगवण इथे कार्यरत आहे.समाजामधील प्रत्येक तळागातील सभासदांना कर्जपुरवठा सरासरी प्रतिवर्ष 3 कोटी रुपये संस्थेच्या माध्यमातून केले जाते.या संस्थेची वार्षिक उलाढाल 9 कोटी इतकी आहे.सभासदांचे व खातेदारांचे हित जोपासणारी संस्था अशी या संस्थेची ओळख आहे.संस्था स्थापनेपासून संस्थेला सतत ऑडिट वर्ग “अ” आहे. तसेच संस्थेमध्ये विजबील भरणा केंद्र सुविधा उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीनंतर संस्थेच्या चेअरमन व व्हा.चेअरमन या पदाच्या निवडीकरिता निवडणूक अधिकारी.एस.एस.काळे यांनी संचालक मंडळाच्या सभेचे आयोजन संस्थेच्या कार्यालयात केले होते.
यामध्ये चेअरमन पदासाठी बोगावत महेंद्र प्रकाशलाल व व्हा.चेअरमन पदासाठी भोंगळे रणजित मधुकर यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने चेअरमनपदी बोगावत तर व्हा. चेअरमनपदी भोंगळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी एस. एस. काळे यांनी जाहीर केले. चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीनंतर संस्थेच्या संचालक,कर्मचारी व पिग्मी एजंट यांच्या वतीने बोगावत व भोंगळे सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अशोक शिंदे जाहीर केले तर आभार संस्थेचे व्यवस्थापक लालासो बगाडे यांनी मानले.