
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगितलं. यानंतर राज्यात राजकारण पेटलं आहे. मुंबईत मातोश्रीसमोर शिवसैनिकांनी कालपासून ठिय्या दिला आहे. रात्री भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीचीही शिवसैनिकांनी तोडफोड केली. काल सकाळी अनेक शिवसैनिक राणा यांच्या खार येथील घराखाली दाखल झाले. राणांनी सोशल मीडियावर लाईव्ह येत हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं ठणकावून सांगितलं. यानंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचं शिष्टमंडळ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेणाऱ असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच प्रमाणे भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती भाजपा नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.
नंतर ते पोलीस आयुक्त यांना भेटणार असल्याची माहिती मुंबई भाजपाचेअध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मोहित कंबोज यांच्या वाहनाची तोडफोड झाल्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहे. विरोधी परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. या विषयावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, अद्याप राज्यपाल कार्यालयाकडून भाजपा नेत्यांची भेटीची वेळ घेतली नसल्याची अधिकृत माहिती समोर आली नाहीय.