
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प यात्रेचा आज समारोप कोल्हापूरमध्ये झाला. या संकल्प सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थीत होते. यावेळी सगळ्याच मान्यवरांनी देशातील महागाई आणि भाजपवरती टीका केली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना एक शपथ दिली आणि २०२४ मध्ये जेवढ्या जागा उभ्या करु तेवढ्या निवडून येण्याचा संकल्प केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
जयंत पाटील यांनी राज्यात प्रचंड दौरा केला. लोकांशी संवाद साधला आणि राज्यात सत्ता आल्यानंतर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कष्ट घेतले. आज एका संघर्षाच्या काळातून आपण जात आहोत. हा देश एकसंघ ठेवायचे आव्हान आपल्यावर आहे. 2014 च्या आधी परिस्थिती वेगळी होती. मनमोहन सिंग यांचे सरकार होते. देशाची उन्नती होईल याकडे भर होता. 2014 ची निवडणूक झाली भाजपची सत्ता आली. पण सत्ता आल्यानंतर हा देश एकसंघ कसा राहील ही जबाबदारी प्रमुखांची असते पण काल चित्र वेगळे असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. शरद पवारांनी यावेळी बोलताना दिल्लीतील दंगलीला गृह खात्याला जबाबदार धरले आहे.
दिल्लीत दंगल, हल्ले झाले. दिल्लीत केजरीवाल यांची सत्ता आहे पण गृहखाते अमित शहा यांच्या हातात आहे पण त्यांनी खबरदारी घेतली नाही. या देशात अस्थिरता आहे असा मेसेज जगभर जातो आहे. जिथे जिथे भाजपच्या हातात सत्ता आहे तिथे हीच अवस्था असल्याचे शरद पवार म्हणाले. कोल्हापूर पोट निवडणुकीमध्ये लोकांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला. आघाडीचा धर्म पाळण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. एक सिनेमा काढला काश्मिरी फाईल अतिरेक्यांनी पंडितांवर हल्ले केले आणि त्यांना काश्मीर सोडावे लागले. यामागचा हेतू हाच होता जातीय संघर्ष निर्माण करायचा आणि मतांचा जोगवा मागायचा अशी टीका शरद पवारांनी भाजपवरती केली आहे.