
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई : राज्यातलं वातावरण कालपासून चांगलंच तापलेलं आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याच्या निर्णय़ावरून शिवसैनिक चांगलेच संतापले होते. दोन दिवस चाललेल्या नाट्यमय घडामोडींनंतर आज अखेर राणा दाम्पत्याने आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार मुख्यमंत्री असते तर परिस्थिती इतकी खराब झाली नसती, असंही नवनीत राणा म्हणाल्या.
यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, “राज्यात कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडवत असेल तर ते उद्धव ठाकरे बिघडवत आहेत. ज्या पद्धतीने डेप्युटी सीएम अजितदादा आदरणीय अजितदादा बोलले की त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की मुख्यमंत्री या सर्व घडामोडींवर नजर ठेवून आहेत. मला वाटतं कारण मुख्यमंत्र्यांना दुसरं काही कामच उरलेलं नाही”.
त्या पुढे म्हणाल्या, “नवनीत राणाला, रवी राणाला कधी माझे गेलेले गुंड मारतायत याच्याकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. रवी राणा, नवनीत राणा सुरक्षित राहिले पाहिजेत, लोकप्रतिनिधीवर काही धब्बा नाही लागला पाहिजे याच्यावर त्यांचं लक्ष नाहीये. याच ठिकाणी जर अजित पवार मुख्यमंत्री असते तर या महाराष्ट्रात परिस्थिती इतकी खराब कधीच झाली नसती. दुसरा आरोप गृहमंत्र्यांवर आहे