
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळा येथे शाळा पुर्व तयारी मेळाव्यात शाळेत विविध प्रकारचे स्टॉल्स , आकर्षक शैक्षणिक चार्ट व गावातील मुख्य रस्त्यानी भव्य बैलगाडी , लेझीम पथक व जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या पोषाखात वेशभूषा केलेल्या मुली यांनी या शाळा पुर्व तयारी सोहळ्याचे लक्ष वेधले. या सोहळ्यात मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक , शिक्षण कर्मचारी , अंगणवाडी शिक्षिका , आशा वर्कर , सेविका , गावातील शालेय समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष , सदस्य , सरपंच , उपसरपंच , पोलिस पाटील , ग्रामसेवक , पालक , विद्यार्थी , यांनी आपला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले व त्यांच्या पालकांना प्रेरीत केले.
या शाळा पुर्व तयारी मेळाव्याची सुरूवात जिल्हा परिषद शाळेत झाली शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी यावेळी पालकांना शाळा पुर्व तयारी चे प्रशिक्षण,गरज व नविन संकल्पना याविषयी आपले मत मांडले.शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यासंबंधी मुलांना अधिक ज्ञान कसे मिळवता येईल याविषयावर सखोल मार्गदर्शन ही केले.सहशिक्षकांनी शाळापुर्व तयारी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.शाळेने केलेली प्रगती व विविध उपक्रम राबवून शालेय मुलांच्या ज्ञानात अधिक भर टाकण्याचे कार्य अविरत पणे चालू असल्याचेव त्यासाठी शाळेतील सर्वच उपक्रमशिल शिक्षकांचे कार्य मोलाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात हातात जनजागृती चे फलक घेऊन गावभर जनजागरण फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत बैलगाडी , लेझीम पथक आकर्षक ठरले त्यानंतर शाळेत येताच मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढून पालक व विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.नुतन विद्यार्थ्याना औक्षण भरून बैंडपथकाच्या गजरात हळदी कुंकवाद्वारे पुजन करून ओल्या कुंकवात पाय बुडवून शाळेच्या वर्गात नव विद्यार्थ्यांच्या पाऊलाचे ठसे उमटलेले.तदनंतर शाळेच्या प्रांगणात विविध शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शनाचे सात ते आठ स्टॉल उभे करून त्या साहि त्याद्वारे प्रात्यक्षिके करून दाखवली.त्यात नाव नोंदणी व विकास पत्र देणे, शारिरीक विकास, बौद्धिक विकास,सामाजिक व भावनात्मक विकास,भाषा विकास,गननपुर्व तयारी यांसह प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली. खाऊचे वाटप करून मेळाव्याचा समारोप करण्यात आला.