
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- जिल्ह्यात अपघाताच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत असून नांदेड- देगलूर रस्त्यावरील हॉटेल अशोका पॅलेस समोर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडके त एका ५० व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. देगलूर-नांदेड हायवे हा मृत्यूचा सापळा बनत आहे. दिवसाआड एक अपघाताची घटना या मार्गावर घडत आहे.
दरम्यान दि. १७ रोजीही या मार्गावर एका अपघातात ५० वर्षीय व्यक्ती ठार झाला आहे. उमाकांत शिवमुर्तीअप्पा गुंदीगुडे (५०, रा.शांतीनगर देगलूर) असे मयताचे नाव आहे.
मयत उमाकांत हे रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदेड-देगलूर रस्त्याने घराकडे येत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. ज्यात गंभीर जखमी होवून उमाकांत गंदीगुडे यांचा मृत्यू झाला. दरम्यान सदर वाहन चालक हा त्याच्या ताब्यातील वाहन हयगय व निष्काळजीपणे भरधाव वेगाने चालवून मयताच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. या प्रकरणी मयताचा मुलगा शंकर गंदीगूडे यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोउपनि मुंडे हे करीत आहेत.