
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
खामगाव :- दि.२४.बैल बाजारामध्ये बैलगाडी विकून आलेले ४९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी खिशातून काढून पळ काढल्याची घटना सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली.याबाबत शनिवार दि.२४ एप्रिल रोजी खामगाव शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील लोणी लव्हाळा येथील शेतमजूर ज्ञानेश्वर दगडू फळ यांच्या मालकीचे दोन बैल विक्री करिता २१ एप्रिल रोजी त्यांनी बैलबाजारात आणले.
चिखली तालुक्याच्या गांगलगाव येथील एका इसमाला दोन्ही बैल एकूण ४९ हजार रुपये किमतीमध्ये विकून मिळालेले एकूण ४९ हजार रुपये त्यांनी खिशात ठेवले.यावेळी बैलबाजार असून जात असताना त्यांच्या पायावर एका बैलाने पाय दिल्याने ती खाली बसले असता त्यावेळी संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या खिशात ठेवलेले एकूण ४९ हजार रुपये काढून तिथून पळ काढला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३७९ भा द वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.