
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अचलपूर तालुक्यातील कांडली भागात येणाऱ्या श्रीराम गॅस एजेंसी गोडाऊनला रविवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.या आगीमुळे गोडाऊन मधील २० ते २२ सिलेंडरचे मोठया प्रमाणात स्फोट झाले.दरम्यान भरवस्तीत असलेल्या या गॅस गोडाऊन मधील सिलेंडरच्या स्फोटामुळे येथील नागरिकांमद्धे एकच खळबळ उडाली.ब्लास्ट झालेले सिलेंडरचे तुकडे अनेक नागरिकांच्या घरात गेल्यामुळे एकच दहशत निर्माण झाली आहे.
माहितीप्राप्तीनुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.गॅस गोडाऊनच्या आजूबाजूला नागरिकांची मोठयाप्रमाणावर घरे व दुकाने आहेत.सद्यस्थितीत उन्हाचा पारा ४०° ते ४५° सेल्सिअस असल्यामुळे भरवस्तीत असलेल्या या मिनी गॅस गोडाऊनला आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.