
दैनिक चालु वार्ता
किनवट तालुका प्रतिनिधी
दशरथ आंबेकर किनवट
किनवट :- शहरातील रेल्वे स्टेशन येथे दि.२४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान आदीलाबाद इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका वय ३४ वर्षीय युवकांचा हात निसटल्याने तो थेट रेल्वेखाली ओढल्या गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक दुर्देवी घटना रेल्वे स्थानकावर आज रोजी घडली आहे. हिमायतनगर रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलेल्या इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्यां नामे गौतम गणपत राऊत रा.सवना ज.वय ३४ वर्ष यांचा अचानक हात घसरुन रेल्वे खाली ओढला गेल्याने त्यांचा जागीच दोन तुकडे होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे हिमायतनगर येथील प्लॅटफॉर्म आणि उभ्या रेल्वेच्याअंतरामुळे पुन्हा एकदा येथील द.म.रेल्वे नांदेड विभागाने एक जीव घेतला असल्याच्या भावना उपस्थित प्रवाशांनी व्यक्त केल्याआहे. त्यामुळे द.म.रेल्वे नांदेड विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाअसल्याचे दिसूनआलेआहे.दि. २४ एप्रिल२०२२ रोजी सकाळी नऊ ते दहावाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.त्यानंतर रेल्वे पोलिसांकडून ही माहिती मिळाली की मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना येथील असून त्याचे नाव गौतम गणपत राऊत वय ३४ वर्ष तो सकाळी दहाच्या आदीलाबाद इंटरसिटी एक्सप्रेसने नांदेडला जाण्यासाठी चालत्या गाडीमध्ये चढत होता.
त्यामुळे त्याचा अचानक हात निसटल्याने तो थेट रेल्वे खालीओढला गेला,यात त्यांच्या शरीराचे दोन तुकडे होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीया आहे.त्यांच्या पश्चात चार भाऊ,पत्नी, दोन मुले,चार मुली,असा मोठा परिवार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.