
दैनिक चालु वार्ता
सिल्लोड प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :- तालुक्याचे आराध्य दैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रा महोत्सवास पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाली. यानिमित्त शहरातील गणपती मंदिर येथून सकाळी टोप व शेंदुराची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. शहरातील जुन्या मंदिरातील पूजेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मुख्य मार्केट ते म्हसोबा महाराज प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने म्हसोबा महाराज यांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी म्हसोबा महाराजांच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला.
याप्रसंगी नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष तथा यात्रा उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष अब्दुल समीर, देविदास लोखंडे, नामदेव चापे, अर्जुन गाढे, नंदकिशोर सहारे, अब्दुल आमेर, राजेंद्र ठोंबरे, दुर्गेश जैस्वाल, राजेंन्द्र बन्सोड, विशाल जाधव, तहसीलदार विक्रम राजपूत, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, कृष्णा लहाने, दुर्गाबाई पवार, दीपाली भवर, शकुंतला बन्सोड, सविता झंवर, कल्याणी गौर, विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, सुनील दुधे, सुधाकर पाटील, मनोज झंवर, राजू गौर, किशोर अग्रवाल, संतोष ठाकूर, सुदर्शन अग्रवाल, सुनील प्रशाद, रघुनाथ घरमोडे, शिवा जोशी, मनोज कोठाळे, राजेंद्र जाधव, संजय मुरकुटे, अशोक बन्सोड, रमेश साळवे, डॉ. मच्छिंद्र पाखरे, डॉ. दत्तात्रय भवर, जगन्नाथ कुदळ यांचेसह उत्सव समितीचे पदाधिकारी व भाविकांची उपस्थिती होती.