
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- शिवा संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्सहाने साजरी करत असते.गेल्या दोन वर्षापासुन देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लावले होते.यावर्षी कोरोनाचा प्रदुर्भाव कमी झाला आहे.शासनाने सर्व निर्बंध उठवले असल्याने यावर्षी महात्मा बसवेश्वर यांची जयंती धुमधडाक्या साजरी होणार आहे.दिनांक 23एप्रिल रोजी कंधार येथे प्रा.मानोहर धोंडे यांच्या अध्यक्षेखाली शिवा संघटनेची बैठक संपन्न झाली.या बैठकीत महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीच्या स्वागतध्यक्ष पदी शहाजी अरविंदराव नळगे तर अध्यक्ष पदी बालाप्रसाद मानसपुरे व कार्यध्यक्ष पदी बालाजी चुक्कलवाड यांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या 22वर्षापासुन शिवा संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये अक्षय तृतीया पासून महिनाभर भव्य स्वरूपात जयंती उत्सव साजरा केला जातो. कंधार तालुक्याच्या वतीने कंधार शहरांमध्ये शिवा संघटनेच्या माध्यमातून दिनांक 19 मे रोजी माईच्या मंदिरापासून दुपारी चार वाजता निघुन कंधारच्या बसस्टँड समोरील संत नामदेव महाराजांच्या सभागृह पर्यंत मोठी भव्य मिरवणूक काढून समारोप याच सभागृहात केला जाणार आहे .या संदर्भात दिनांक 23एप्रिल रोजी कंधार येथिल बालाजी मंदिर येथे पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे,नगरसेवक शहाजी नळगे,माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड,मानसपुरीचे सरपंच बालाप्रसाद मानसपुरे,शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुभम घोडके,साधु पा.वडजे त्र्यंबक भोसीकर,अदिसह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत जयंती महोत्सव समीतीच्या पदधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आली असुन कंधार नगर पालिकेचे प्रथम नागरिक सौ.शोभाताई नळगे यांचे प्रतिनीधी म्हणून नगरसेवक शहाजी नळगे यांची स्वागतध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.तर जयंती महोत्सव अध्यक्ष बालाप्रसाद मानसपुरे व कार्यध्यक्ष म्हणून माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांची निवड केली आहे.19मे रोजी होणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीत मोठ्या संख्याने बहुजन बांधवानी उपस्थित राहवे असे अहवान प्रा.मनोहर धोंडे यांनी केले आहे.