
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे /मुंबई :- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने २०१४ पूर्वीचे ५१७ प्रकल्प रद्द केल्यानंतर म्हाडानेही अनेक वर्षे रखडलेले ३८ पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विकासकाला प्रकल्प रद्द का करू नये, याबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. याशिवाय म्हाडाच्या भूखंडावर राबविण्यात येत असलेले २३ पैकी १८ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रद्द करण्यात यावेत, असे झोपु प्राधिकरणाला कळविण्यात आल्याची माहिती मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली.
रखडेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कारवाई बाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळात दिली होती. त्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तसेच म्हाडाने रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. म्हाडाचेही अनेक प्रकल्प रखडलेले असल्याचे निदर्शनास आले. अनेक वर्षे रखडलेल्या व काहीच हालचाल नसलेल्या ३८ प्रकल्पांना नोटिसा देण्यात आल्या. आता संबंधित विकासकाचे म्हणणे ऐकून घेऊन नंतर संबंधित योजना रद्द केल्या जाणार असल्याचे म्हसे यांनी सांगितले.