
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधि
मारोती कदम
नांदेड :- नांदेड येथील नामांकित अशा ग्यानमाता विद्या विहार नांदेड या शाळेतील क्रीडा शिक्षक श्री विनोद गोस्वामी सर हे आपल्या न्याय मागण्यासाठी ग्यान माता विद्या विहार शाळेच्या गेट समोर गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणास बसलेले आहेत. गेल्या दोन वर्षापासून शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे 50% वेतन शाळा प्रशासनाने थकित ठेवलेले आहे ,तसेच दोन वेतनवाढी देत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे व त्यामुळे शाळेतील गोस्वामी सरांसह इतर सर्व कर्मचाऱ्यांची कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडले आहेत.श्री विनोद गोस्वामी सरांची मागणी अत्यंत योग्य आहे.
त्यामुळे शिक्षक भारती नांदेडच्या वतीने त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून उपोषणास पाठिंबा देण्यात आला. व तब्येतीची काळजी घेण्याची विनंती करण्यात आली.यावेळीजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील कुनके सर,संजय शेळगे, शिवाजी राठोड,अमोल कुलकर्णी,बालाजीराव गादगे,गोविंद घोडके,हदगाव ता.उपाध्यक्ष प्रकाश कांबळेसर यानी आंदोलनाला भेट देऊन समर्थन दिले. तसेच शाळा प्रशासनास पण विनंती आहे की त्यांनी तात्काळ मागण्या मान्य करून उपोषण उठवावे.